विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सगळ्यात मोठा पक्ष आणि शिवसेना दुसरा पक्ष ठरला आहे. दोन्ही पक्षांच्या युतीला जनतेने बहुमत दिले.दोन्ही पक्ष एकत्र सत्ता स्थापन करणार असे वाटत असताना युतीमध्ये वाद सुरु झाले. मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली. या सगळ्यात संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर शिवसेनेची ठाम भूमिका मांडली.
सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापन करण्याची इच्छा आहे का आणि तशी त्यांची तयारी आहे का, अशी विचारणा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सत्तापेच आता निर्णायक टप्प्याकडे पोहोचला वाटत असतानाच
निवडणुकीपूर्वी युती केलेले भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीनंतर शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा कोश्यारी यांना दिला होता.

त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजपने आधी सत्तास्थापनेचा दावा करावा, त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असं म्हटलं होतं.
'१०५ आमदारांचं संख्याबळ असणाऱ्या भाजपनं राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केलाच पाहिजे' असं आवाहन देत 'मोठा पक्ष सरकार स्थापन करायला अपयशी ठरला, तर आम्ही आमचा मुख्यमंत्री करू, एवढं संख्याबळ आमच्याकडे निश्चित आहे,' असा पुनरुच्चार शिवसेनेनं केला आहे.महाराष्ट्रात निवडणुकांचे निकाल येऊन पंधरा दिवस उलटले तरीही महायुतीतली सरकार स्थापनेची चर्चाच सुरू आहे  दिवसागणिक शिवसेना आणि भाजपतला तणाव वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर सतत माध्यमातून मुलाखती देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर दबावाची सेनेची भूमिका कायम ठेवली होती .
अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद हाच सेना आणि भाजपामधला कळीचा मुद्दा होता. मुख्यमंत्री पदावरचा शिवसेनेचा दावा कायम ठेवतांना भाजपानं दिलेला शब्द फिरवला आहे, असं सतत शिवसेनेचेवतीने संजय राऊत यांनी सांगत होते  
भाजपाने सरकार न बनवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मात्र प्रत्यक्षात राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रण दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि त्यांचे आमदार बहुमत सिद्ध करण्यासाठी अपयशी ठरले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी निमंत्रण दिले.या सर्व खेळांमध्ये महाराष्ट्रातील नागरिक मात्र वाऱ्यावर आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला या सर्व पक्षांपैकी कोणीच तयार नाही हे लोकशाहीला अत्यंत घातक प्रकार आहे. ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे .
 
Top