पंढरपूर ,(प्रतिनिधी) - कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस.के.एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली  'आयसीटी फाँर डेव्हेलोपमेंट' या विषयावर  ५ दिवसिय फँकल्टी डेव्हेलोपमेंट प्रोग्राम (FDP)चे आयोजन केले आहे.
एफडीपी उद्गाटन कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. संगमनाथ उप्पीन यांनी केली.  

सिंहगड महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि त्यांना करिअरसाठी फायदा व्हावा या हेतूने आयसीटी फॉर डेव्हेलोपमेंट या विषयावर पाच दिवशीय फँकल्टी डेव्हेलोपमेंट प्रोग्रॅम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 सुरवातीस पहिल्या सत्राचे रिसोर्स पर्सन प्रा.बालाजी कोरे यांचा सत्कार सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. चेतन पिसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी या एफ.डी.पी चे समन्वयक प्रा. डी. एस्.जगताप यांच्यासह महाविद्यालयातील सहभागी प्राध्यापक उपस्थित होते. उपस्थितांचे प्रा.यशवंत पवार यांनी आभार मानले
 
Top