ना शिस्त ना पर्वा वेळेची गर्दी भामट्यान्ची येथे 
फक्त खिसे भरणे एकच ध्यास चिंता खुर्चीची येथे !!

ना चारित्र्य ना पावित्र्य बेफिकीर सारे येथे 
पैशापुढे सारेच मातीमोल कोणास चाड येथे !!


मुखवटे त्यांचे फसवे खोटे हसणे येथे 
पावलोपावली शब्द फिरवणे कसब येथे !!

वरून देव आतून दानव दुतोंडी वीर येथे 
जात पैसा दहशत हीच हत्यारे यांची येथे !!

पेरती सर्वत्र अनीती नीती रूजेल कशी येथे 
जाईल तिथे पीक अनीतीचे माजलेले येथे !!

सारेच दावे करतात अनुयायी महात्म्यांचे  येथे 
प्रत्यक्ष दाऊद गवळी मल्ल्या फिक्के येथे !!

आनंद कोठडीया,जेऊर ९४०४६९२२००


 
Top