जिल्हाध्यक्षपदी उत्तम बागल तालुकाध्यक्षपदी संभाजी वाघुले 

 पंढरपूर,(प्रतिनिधी)- सोलापूर जिल्हयातील पत्रकारांची पंढरपूर येथील रेस्ट हाऊस येथे पाँवर आँफ मिडीया या पत्रकार संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष महादेव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शक मधुकर गंलाडे व राज्याचे सचिव अनिल कदम हे होते.
        यावेळी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अमित डोळ,डाँ.श्रीधर यलमार, पांडुरंग सुर्यवंशी,बिरूदेव केंगार,शैंलेद्र मस्के,चंदनशिवे आदि उपस्थित होते.
   यावेळी चव्हाण म्हणाले,संघटनचे कार्यक्षेत्र संपुर्ण महाराष्ट्र असून पत्रकारांना योग्य तो न्याय आणि सन्मान देण्याचे काम या संघटनेकडून केले जात आहे.नवीन पत्रकारांना त्यांच्या हक्काची महिती करून दिली जात आहे.
   यावेळी सोलापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर करणयात आली.सोलापूर जिल्हाध्यक्ष - उत्तम बागल,जिल्हा उपाध्यक्ष - विठ्ठलराव वठारे,जिल्हा सचिव - प्रशांत माळवदे,पंढरपूर तालुकाध्यक्ष - संभाजी वाघुले,माळशिरस तालुकाध्यक्ष - नानासाहेब नाईकनवरे,पंढरपूर शहराध्यक्ष - पिंटू भोसले यांची निवड करण्यात आली.
       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल कदम यांनी केले.सूत्रसंचालन प्रशांत माळवदे यांनी केले.आभार उत्तम बागल यांनी मानले.
 
Top