पंढरपूर दि.२० :-  टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा प्रतिनिधीची नेमणूक  अधीक्षक डाक घर  पंढरपूर यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तरी इच्छुक विमा एजंट साठी उमेदवारांनी  अर्ज करावेत असे आवाहन डाकघर विभागाचे अधीक्षक एन रमेश यांनी केली आहे
     टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा एजंट ची नेमणूक करण्यासाठी उमेदवारांनी आपले अर्ज रजिस्टर अथवा स्पीड पोस्टाने विहित नमुन्यात भरून सादर करावेत.अर्जावरती डाक जीवन विमा अथवा ग्रामीण विमा एजंटसाठी अर्ज असे लिहून अधीक्षक डाक घर पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्या नावे दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत पाठवावेत.
     अर्ज केलेल्या उमेदवारांची थेट मुलाखत दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत  होणार असून, उमेदवारांनी अधीक्षक डाक घर पंढरपूर येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे तसेच नमुना अर्ज व अधिक माहितीसाठी पंढरपूर विभागातील सर्व पोस्ट कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहनही डाकघर विभागाचे अधीक्षक एन रमेश यांनी केली आहे.
 
Top