बँकांच्या वेळा बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून झाली. यानुसार बँकेचे कामकाज सकाळी ९, १० आणि ११ अशा विविध वेळी सुरू झाले आहे. पण हे करताना खातेदारांच्या रूपात असलेल्या ग्राहकांना विचारात घेतलेलेच नाही. या वेळा समजून घेण्यात ग्राहकांना त्रास होत आहे. त्यामुळे याचा सरकारने पुनर्विचार करावा,अशी मागणी कर्मचारी युनियनने केला आहे. 

   जर खरोखरच कर्मचारी युनियनने ग्राहकांच्या हितासाठी मागणी केली असेल तर ते आश्चर्यकारक आहे कारण त्यांच्यासमोर पासबुक भरून घेण्यासाठी, काही माहिती विचारण्यासाठी तासन्तास उभे राहिले तरीही ते तोंड वर करून पाहत नाहीत किंवा बोलत नाहीत . ऑनलाइन इंटरनेट वापरणारे पन्नास टक्के ग्राहक आहे मात्र जे पन्नास टक्के आहेत त्यांना यामधील काही कळत नाही परंतु पुरेसे कर्मचारी नाहीत, एटीएम बंद असते, पासबुक प्रिंटिंग बंद असते आणि त्यामुळे एका हेलपाटेमध्ये काम होत नाहीत. एसबीआय सारख्या बँकांचे NOQUE app  आहे मात्र ते चालू नसते. त्यामुळे अनेक चकरा माराव्या लागतात. दिवस अनेक वाया घालवावे लागतात, त्यामुळे कर्मचारी संघटनांनी  खातेदारांची वेळेची काळजी न करता बाकीच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले तर बरे होईल.
 
Top