नेवासा,- साखर विश्व प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य, नेवासाचे संस्थापक-सचिव अविनाश मनोहर कुटे पाटील यांची दि डेक्कन शुगर टेक्नाॅलाॅजीस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे या संस्थेचे सल्लागार मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.


त्यांना महामानव बाबा आमटे,वनराईंचे मोहन धारिया, जेष्ठ स्वातंत्र सेनानी व सवोदयी गंगाप्रसाद अग्रवाल, गोविंदभाई श्रॉफ,स्वाध्ययी आठवले दादा,ग्राहक चळवळीचे बिंदुमाधव जोशी, माधवराव चीतळे, सदाशिव अमरापुरकर, अण्णा हजारे,सिंधुताईं सपकाळ अशा मोठ्यांचा सहवास लाभलेला असून साखर क्षेत्रात त्यांचे साखर कामगार व शेतकरी बांधवांसाठी उत्तुंग कार्य आहे.
नुकतीच त्यांची दि. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिट असोसिएशन ऑफ इंडिया ,पुणे च्या सल्लागार मंडळावर नियुक्ति झाल्याने श्री.अंबालिका शुगरचे चिफ इंजिनिअर श्री.भिसे साहेब यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .
 

यावेळी चिफ केमिस्ट नितिन शिंदे साहेब, श्री.खताळ सो.,इंजिनीअर सर्वश्री योगेशकुमार भोसले,ज्ञानेश्वर थोरात,सचिन भोसले,रोशनकुमार तावरे,जयदीप गाडे,नितिन लोंढे,मनोज होलम ,केमिस्ट महादेव लोखंडे, अनिल आवाळे, सुर्यवंशी,जराड, मुळे आदि उपस्थित होते. 
श्री. कुटे पाटील यांनी अंबालिका परिवारासह DSTA चे अध्यक्ष श्री.गंगावते ,उपाध्यक्ष एस.एस. भड़,मा.देव सो व ए.आर.पाटील,चारुदत्त देशपांडे, दत्ताराम रासकर ,बोखारे सो.यांचेसह शुगर परिवाराचे आभार मानले.
 
Top