पंढरपूर- दि.१७ नोव्हेंबर २०१९ रोजी हिंदुहृदयसम्राट श्रीमान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ७ वा स्मृतिदिन संतपेठ येथे साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी शहर प्रमुख हरिभाऊ पवार व माजी उपशहर प्रमुख भास्कर साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शिवसैनिकांनी पुष्प फुले वाहून विनम्र अभिवादन केले.
   

यावेळी रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन महिला आघाडी तालुका प्रमुख सौ.आरतीताई बसवंती यांनी रक्तदान करून केले. यावेळी शिवसैनिक तसेच बाळासाहेब प्रेमींनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला. 
यावेळी सौ.संगीता पवार, माऊली अष्टेकर, माऊली मोरे, बाळासोा रणदिवे, शशि जाधव, नवनाथ मोहिते, चंद्रकांत पवार, गौतम लेंडवे, राहुल परचंडे, सिध्दू कोरे, समाधान अधटराव, काका बुराडे, कैलास नवले, संजय कदम, सुनिल म्हेत्रे, शिवाजी कोष्टी, पंकज डांगे, अवि वाळके, लंकेश बुराडे, गणेश वाघमारे, धनु खंडागळे, संभाजी वाघमोडे, दत्ता घोडके, संतोष कोळी, लक्ष्मण पाटील, युवराज गोमेवाडीकर, नितीन थिटे, महेश पडळकर, बाळू गायकवाड, पप्पू पितळे, अंबादास मराठे, राहुल घोडके, विजय वरपे, संतोष माने, हरिभाऊ शिंदे, प्रकाश बंडगर, आप्पा गोडसे, गौस तांबोळी यांच्यासह अनेक शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रम मातोश्री मिनाताई ठाकरे प्रतिष्ठान, धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान व शहर व तालुक्या तील शिवसैनिकांच्यावतीने प्रतिष्ठानचे संस्थापक संजय घोडके यांनी आयोजित केला होता. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद घोडके, शाम बनसोडे, विशाल जाधव, गणेश निंबाळकर आदिंनी परिश्रम घेतले.
 
Top