श्री तयारी ,सीताराम महाराज समाधी मंदिर, खर्डी - (छाया अमोल कुलकर्णी)


   खर्डी, (अमोल कुलकर्णी)-सोलापूर जिल्हातील तीर्थक्षेत्र खर्डी ता. पंढरपूर येथील श्री सीताराम महाराजांचा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हरिनाम सप्ताहचे आयोजन केले असल्याची माहिती समाधी मंदिर ट्रस्ट यांचे वतीने देण्यात आली. दिनांक १८ नोव्हेंबर रोजी हरिनाम सप्ताह सुरू होईल. मानाप्रमाणे सप्ताहाचे सात दिवस केसकर(कुलकर्णी) घराण्याकडे प्रत्येकी एक दिवस पूजा नैवेद्य आरतीचा मान असतो.दिवसभर प्रवचन, कीर्तन ,रात्रभर जागर ,पारायण केले जाते.आठवडाभर मंदिर ट्रस्ट ,ग्रामस्थ तसेच भाविक यांचेकडून रोज मिष्टान्न भोजन वाटपाच्या पंगतीचे आयोजन केले आहे.यावेळी मुख्य विश्वस्त हरीभाऊ कुलकर्णी,अध्यक्ष दीपक रोंगे,सचिव गंगाधर केसकर,विकास कुलकर्णी,उमेश  परिचारक आदी उपस्थित होते.

भंडारा हा मुख्य उत्सव 

दिनांक २४ नोव्हेंबर रोजी कार्तिक वद्य त्रयोदशीला पुण्यतिथी उत्सव म्हणजे भंडारा साजरा केला जातो. श्रींच्या समाधीवर दुपारी १२ वा पुष्पवर्षाव केला जातो.आरती व महाप्रसाद वाटप केले जाते.त्यानंतर पालखीचे मिरवणूक होते.राज्या बरोबरच कर्नाटक ,गुजरात,आंध्र प्रदेश आदी भागातून भाविक हजेरी लावतात.यात्रा कालावधीसाठी ग्रामपंचायत खर्डीच्यावतीने स्वच्छता ,पाणीपुरवठा,लाईट,पार्किंग तयारी केली जात आहे. 
 
Top