सत्तर वर्ष ज्यांनी तुला काही ना काही कारणाने  झुलवल - त्यांना ही तू आत्ता झुलवाया लावलस् रे बाबा तुला लाख लाख प्रणाम.....

आपला महाराष्ट्रातील मतदारांजा जागृत-सुज्ञ आहे तो येरे माझ्या मागल्याप्रमाणे नव्हेच् हे या वर्षीच्या निवडणकीतून दाखवून दिले आहे,आपला मतदारराजा सर्व राज्यांना विचार करायला लावणरा मतदारराजा होय हे या निवडणुकीवरुन सिद्ध होतय, सा-या देशासह लक्ष लागलय आपल्या महाराष्ट्राकड़े ......

तुम्ही कितीही पक्ष काढ़ा, आघाड़या काढ़ा , कुरघोड्या करा पण आम्हीही मतदारा राजा आहोत हेही आम्ही दाखवून दिलेच् आहे.

 प्रस्थापीत व विरोधक दोघांचीही गम्मंत मतदारराजा तु लावून दिलीस मानावं लागेल राजा तुला...

पण राजा बघं तुझ अमूल्य मत घेतांना तुला केलेल्या विनवण्या ,दिलेली तत्वे,वचने,वादे इरादयांची कशी पायमल्ली होतेय राजा हेही लक्षात ठेवायला तु विसरनार नाहीये राजा है मला पक्क ठावुक हाय बाबा .....

मतदारराजास् केलेली तत्वे ,वचने, प्रार्थना सर्वानवर पाणी सोडून राजकारणी कशा आघाड़या-बिघाड़या नव्हे नव्हे कुरघोड्या करुनही जमत नसल्याने कसे कायदयाच्याही मागे लागले आहेत रे बाबा.....
तुला मानल रे बाबा मतदार राजा तु अगदी मनापासुन त्यांना कामाला लावलेस् रे बाबा.....

मतदारराजा तु राजा आहेस् , तुझ्यादारी एक विचार मांडतो बाबा बघं तुला जमल तर......
 कारण इतर ठिकाणी मांडून काही उपयोग होईल असं मला वाटत नाही.
पण राजा तुझे दारी मन मोकळ करायला मला आवडेल व तु मनावर घेतलस् तर सर्वकाही अशक्यच् पण शक्य होत तुजकडुन यावर माझा  विश्वास आहे मतदारराजा.....

आपली लोकशाही जगात एक नंबर आहेच, पण काही देश विदेशात म्हणे अध्यक्ष ,पंतप्रधान , मुख्यमंत्री सर्व संविधानिक मुख्य पदे जनतेतुन निवडली जातात म्हनुन ती जनतेचीच कामे करतात व जनतेची कामे न् केल्यास जनता त्यांना काही प्रमाणात स्वाक्षरी अभियान करुन मागेही बोलावते राजा......

आपल्याकड़े आपण खासदार,आमदार निवडतो व ते पंतप्रधान/मुख्यमंत्री निवडतात म्हनुन आपले पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचा बराच् वेळ या मंडळीची सुख दुःख आवरण्यात,सावरन्यातच्  जातो. राजा - रुसला की घे साखर कारखाना ,घे पेट्रोल पंप,घे बैंक,कमिट्या समित्या घोटाळे,शुद्धीपत्रे असे चित्र वारंवार पहावयास मिळते असे वाटते राजा....

म्हणतात आधुनिक - डिजिटीलायजेशन युग आलाय सर्व काही अपडेट्स ,ऑटोअपडेट्स होतया.....
पण सरकारी कार्यालये तुझी प्रश्न, ग्रामसेवक,तलाठी,तहसील कलेक्टर , पोलिस,महावितरण समाजाभिमुख होण्यास  उदाशीन दिसतीया.... निवडणुक आली की रेल्वे, रस्ते,पाणी, रोटी कपड़ा और मकान जाहिरनामे वचनामेवर केवळ झळकतांनाच् दिसतीया....

म्हणुन धकाधकीच्या आधुनिक युगातील तु अपडेट्स तत्पर मतदारराजा तुज़ विनवणी करतो बाबा - घे भरारी हो तत्पर........

पंतप्रधान,मुख्यमंत्री ,अध्यक्षीय संविधानिक पदे जनतेतून निवङ ,पक्षीय जाहिरनामे,वचननामें अंमलबजावणी कायदयाने  कटीबद्द करण्यासाठी मतदारराजा हो तत्पर मतदारराजा हो तत्पर........

अविनाश मनोहर कुटे पाटील, नेवासा अहमदनगर 
अभियंता,मुक्तलेखन व प्रयोगशील शेतकरी 
मो.न.9226428756


 
Top