जयसिंगपूर - आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्यावतीने उत्कृष्ट दिवाळी अंकांना विविध पुरस्कार दिले जातात. त्याचबरोबर सर्वाधिक दिवाळी अंकात ज्या साहित्यकांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे अशा मान्यवरांना विशेष पुरस्काराने गौरविले जाते. ज्या साहित्यिकांना या स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपले पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि २०१९ या वर्षी ज्या दिवाळी अंकात त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे त्याची यादी उदाहरणार्थ (१)अनुक्रमांक, (२) दिवाळी अंकाचे नाव, (३) प्रसिद्ध झालेला साहित्य प्रकार, (४) पृष्ठ क्रमांक आणि (५) संबंधित दिवाळी अंकाचा संपर्क क्रमांक व पत्ता इत्यादी खालील इमेलवर किंवा व्हाटस्अप क्रमांकावर पाठवावा... 8484986064, sunildadapatil@gmail.com
असे आवाहन डॉ सुनील दादा पाटील यांनी केले आहे .
 
Top