सोलापूर - पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने राज्यांत सुरू असलेल्या डिजीटल व्हॅन चा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते डिजीटल व्हॅन चा शुभारंभ करण्यात आला. 
जिल्हा परिषदेच्या आवारात या डिजीटल व्हॅन चा शुभारंभ करणेत आला. या प्रसंगी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, समाज कल्याण विभागाचे सभापती शिला शिवशरण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, पक्ष नेते आनंद तानवडे, जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, सचिन देशमुख, रेखा राऊत, स्वाती कांबळे, रोहिणी मोरे , आण्नाराव बाराचारी, श्रीमंत थोरात, बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब देशमुख , सचिन शिवशरण, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते. 
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवणेसाठी लोकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात पायाभूत सर्व्हेक्षणातून वगळलेल्यां कुटूंबांची शौचालये पुर्ण करणेसाठी व स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी १५० ग्रा.प. मध्ये स्वच्छतेची फिल्म दाखविणेत येणार असल्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी सांगितले. 

जिल्हयात स्वच्छतादूतांना प्रशिक्षीत करणेची आवश्यकता - सभापती विजयराज डोंगरे 

सोलापूर जिल्ह्यात स्वच्छागृही नेमण्यात आले आहे. या स्वच्छागृहीना प्रशिक्षण देऊन स्वच्छतेचे सातत्य गाव पातळींवर टिकविणेसाठी मदत होणार आहे. शौचालयाचा वापर व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे हे ग्रामपंचायती समोर आवाहन आहे. ते पेलणेसाठी स्वच्छागृहीची भुमीका महत्वाची आहे, असेही डोंगरे यांनी सांगितले. 
प्रत्येक गावाचा स्वच्छता आराखडा तयार करणेत येत असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांनी सांगितले. 
या प्रसंगी लेखाधिकारी अर्चना कसबेकर,  संवाद सल्लागार सचिन सोनवणे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर बंडगर, प्रशांत दबडे, महादेव शिंदे, उपस्थित होते. मंगळवार पासून उत्तर सोलापूर तालुक्यांतील नान्नज ,वडाळा, कोंडी , कौठाळी, डोणगाव हिरज, मार्डी ,कारंबा, 
गावडी दारफळ,अकोलेकांटी ,पाथरी,हिपरगा, खेड या गावातून डिजीटल व्हॅन फिरणार आहे. दररोज ५ ग्रा.प. ना भेट देणार असल्याचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी सांगितले.
 
Top