नवी दिल्ली , वृत्तसंस्था – रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर कॉल केल्यास शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने मात्र ग्राहकांसाठी नवीन योजना आणली असून ६ पैसे कॅशबॅक असे या ऑफरचे नाव आहे. 

   या योजनेमध्ये तुम्ही पाच मिनिटापेक्षा अधिक काळ कॉल केल्यास तुम्हाला ६ पैसे कॅशबॅक मिळणार आहे. हे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएल नवनवीन युक्त्या वापरत आहे. त्याचबरोबर या ऑफरमुळे कंपनीच्या ग्राहकांमध्ये देखील वाढ होण्याची आशा कंपनीने व्यक्त केली आहे. आजच्या जमान्यात ग्राहकांना व्हॉईस आणि डाटा क्वॉलिटी सर्व्हिस हवी असते, त्यामुळे आम्ही ग्राहकांना उत्तम सेवा आणि नेटवर्क पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत.हि ऑफर वायरलाईन, ब्रॉडबँड आणि FTTH या सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी असणार आहे, त्यामुळे जिओचे नाराज ग्राहक आमच्याकडे वळतील असे बीएसएनएलचे डायरेक्टर विवेक बंजल यांनी सांगितले.

 आता या ऑफरची सगळीकडे चर्चा सुरु झाली असून यामुळे कंपनीला मोठा फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
 
Top