रांची : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान रांची येथील तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने तीन बाद २२४ धावांची मजल मारली आहे. या कसोटीत पावसाच्या व्यत्ययामुळं पहिल्या दिवशी ५८ षटकांचाच खेळ होऊ शकला. त्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताची तीन बाद ३९ अशी घसरगुंडी उडवली होती. परंतु सलामीवीर रोहित शर्मा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या मुंबईकरांनी तिसऱ्या विकेटसाठी १८५ धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताचा डाव सावरला.
रोहित शर्माने १६४ चेंडूंत १४ चौकार आणि ४ षटकार ठोकून ११७, तर अजिंक्य रहाणेने १३५ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ८३ धावांची खेळी केली. चौफेर फटकेबाजी करणाऱ्या रोहितने आजच्या सामन्यात चार नव्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
 
Top