पंढरपूर (प्रतिनिधी)- शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटना महिला आघाडी मंगळवेढा यांनी २५२-पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा अपक्षांना पाठींबा न देणाचा निर्णय घेतला आहे.शिवबुध्द संघटना ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही.कारण या संघटनेचा उद्देश आहे की बाराबलूतेदारांनो हाक तुमची साथ आमची हे ब्रीद वाक्य डोळ्यांसमोर ठेवून सामाजिक कार्य करण्याची पध्दत आहे. आणि शिवबुध्द संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळून देण्यासाठी व बेरोजगार युवकांनाच्या हाताला काम मिळून आणि महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणे.हे शिवबुध्द कार्य पध्दत चालू आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला पाठींबा न देण्याचा निर्णय घेण्यात आला असे शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी जाहीर केले.
यावेळी शहर कार्याध्यक्ष रविराज मुटकुळे, शहर उपाध्यक्ष अजय गुंड,रेखा सांळुखे, रंजना शिंदे, काक्कासाहेब थोरात,शारदा यादव,कल्पना खरबडे,सुदामती यादव,माळी मॅडम,अशोक सुतार,सागर ढवळे आदि उपस्थित होते .
 
Top