येथे वंदन महात्म्याना पण चंदन नेत्यांना आहे 
कोठेही जा सर्वत्र सत्याचा मात्र पंचनामा आहे !!

येथे अनैतिकता सम्राट आहे नीतीला मात्र माती आहे 
देणे घेणे हाच येथे शिष्टाचार सर्वत्र संविधानाचा लिलाव आहे !!

येथे खरे बोलणारास शिक्षा आहे लबाडान्चा सन्मान आहे 
राजकारणाच्या  घोड्यावर स्वार गुन्हेगारांची टोळी आहे !!

प्रत्येकाला वरून नाही रे गटाचा लळा आहे आतून तो काळा आहे 
प्रत्येकाला सत्तेचा हिरवा मळा हवा आहे बाकी सारे नाटक आहे  !!

देश सेवा प्रदर्शनीय आहे वरून देवांचा मुखवटा आहे 
प्रत्यक्ष यांच खाण पाहून राक्षसही लाजतो आहे !!

आनंद कोठडीया,जेऊर ९४०४६९२२००

 
Top