पंढरपूर  – मी माणसं कमविण्याचे काम केले तर विरोधकांनी संपत्ती गोळा केली . मी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत आलो , कोणी हाक मारली तर सदैव धावून गेलो आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत माझा विजय निश्‍चित असून जनतेने कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस व महा आघाडीच्या मित्रपक्षांचे उमेदवार भारत भालके यांनी महावीरनगर, पंढरपूर येथे झालेल्या कॉर्नर सभेत बोलताना केले . ते म्हणाले, नगरपालिका माझ्या ताब्यात आल्यानंतर शहरा मध्ये अनेक विकासकामे केली. महापुरूषांची स्मारक उभारली आहे. परंतु काही जणांनी फोडाफोडीचे राजकारण केले. गोरगरीबांच्या जमिनीवर आरक्षण टाकून स्वतःची संपत्ती काही जणांनी वाढविली. परंतु मी माणसे कमविण्याचे काम केले आहे. शहरातील गुंडागर्दी व अनेक समस्यांबाबत मी विधानसभेत आवाज उठविला. परंतु विरोधकांनी केवळ आपआपसामध्ये भांडणे लावून काट्याने काटा काढण्याचे काम केले आहे. शहरामध्ये झाडे लावण्याचे काम केले असेल तर ती कुठं लावली ते तरी दाखवा? असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले. ही निवडणूक विधानसभेची आहे. ज्यांनी सैनिकांचा अपमान केला तेच माझ्या शरिरावर आता टीका करीत आहे. मी माझ्या किडण्यांचे मी बघतो ,तुम्ही अगोदर तुमचे रक्त तपासा.ड्रेनज बांधणीत झालेल्या गैरप्रकाराबाबत शिवतीर्थावर येवून उत्तर द्या असे आवाहन विरोधकांना केले.
याप्रसंगी समाधान फाटे, सागर यादव, संदीप मांडवे, सुमित शिंदे, अ‍ॅड राजेश भादुले आदींनी भाषणं केली.  यावेळी संजय बंदपट्टे, नगरसेवक सुधीर धोत्रे, महादेव धोत्रे, लखन चौगुले, राहुल साबळे, किरण घाडगे, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,दीपक येळे,संजय भिंगे, दत्ता भोसले,अशोक बंदपट्टे,महेश धोत्रे,धनू पवार, नितीन धोत्रे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
 
Top