मतदान साहित्यासह कर्मचारी रवाना

              पंढरपूर दि.२०- पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा  सज्ज  झाली आाहे. मतदान साहित्यासह निवडणूक कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झालेअसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन  ढोले यांनी दिली.


            पंढरपूर विधानसभा मतदार संघात ३ लाख ३३ हजार ५७९ मतदार  आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये १ लाख ७३ हजार ९०९ पुरुष व १ लाख ५९ हजार ६६७ स्त्री मतदार तर इतर ३ मतदार आपल्या मतदाराचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंघात एकूण ३२८ मतदान केंद्रे असुन, या मतदाना प्रक्रीयेसाठी  केंद्रावर १४४४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक  नियुक्त अधिकारी व  कर्मचाऱ्यांना वेळेत मतदान साहित्य वाटप करण्यात येवून मतदान केंद्रावर रवाना करण्यात  आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी दिली.

     

   मतदासंघात मतदान यंत्रे व बॅलेट युनिट ६५६ , ईव्हिएम कंट्रोल युनिट ३२८ व व्हिव्हिपॅट युनिट ३२८ असे बुथ निहाय मतदान साहित्यासह  मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. तसेच मतदान केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात इाली आहे. मतदान केंद्रावर साहित्य पोचवण्यासाठी परिवहन महामंडाळाच्या ४८ बसेस तर ५ खाजगी वाहनांचा  वापर करण्यात आला असल्याची  माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन  ढोले यांनी दिली.
 
Top