पंढरपूर, – भाजप - सेना घटक पक्षांचे महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या गुरूवारी सोलापूर जिल्ह्यात येत असून मंगळेवढा येथे सकाळी ११ वाजता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महायुती उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ सभा होत आहेत.त्यांची मंगळवेढ्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. यानंतर दुपारी माळशिरसचे भाजपा उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी नातेपुते येथील पालखी मैदानावर सभा होत आहे. 

याप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, युटोपीयन शुगर्सचे अध्यक्ष उमेश परिचारक, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,भाजपचे शशिकांत चव्हाण,माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड, नगरसेवक अजित जगताप,माजी सभापती शिवानंद पाटील, शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, अरुण किल्लेदार,धनंजय खवतोडे,विजय बुरकुल, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील,संतोष मोगले,औदुंबर वाडदेकर,खन्ना माळी,भारत पाटील, काशिनाथ पाटील आदी उपस्थित होते.

महाजनादेश यात्रेस मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यात आले असता त्यांना वेळेअभावी मंगळवेढा येथे येता आले नाही.त्यामुळे आज त्यांनी मंगळवेढा येथे सभा घेणार असल्याचे सांगितले.
   पहिली सभा मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघा साठी ठेवली आहे.मंगळवेढा तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.हे सर्व प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहेत. त्यासाठी ते मंगळवेढा येथे येत आहेत. ते सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. 

  
दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षानेही गुरूवारी खासदार अमोल कोल्हे यांच्या सभा नातेपुते व मंगळवेढ्यात आयोजित केल्या आहेत. मंगळेवढ्यात दुपारी तीन वाजता आठवडा बाजार मैदानात कोल्हे यांची सभा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ होत आहे. प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने विविध पक्षांच्या नेत्यांनी मॅरेथॉन प्रचार सभांचे आयोजन केले आहे.
 
Top