तिसरा डोळा :

कोणास निवडावे प्रश्न भेडसावतो आहे 
विश्वासालाच बळी देवून जो तो लढतो आहे !!

त्यांचे जाहिरनामें वचने शब्द सारे खोटे आहे 
गरजेपुरते मतदार 
एरव्ही ठेकेदारांचाच राबता आहे !!

मतदानापर्यंत विनयशिल जिंकताच उद्धट होतात 
कामासाठी ते फक्त आर्थिक व्यवहार करतात !!

सत्तेवर येताच मतदारांना विसरतात 
देणे घेणे महत्वाचे 
भवितव्य वारसदाराचे पहातात !!

कोठेही असो गरजेनुसार पक्षांतर् त्यांचा गुण आहे 
कसेही असोत सत्तेत तेच संधीसाधुन्चाच शाप आहे !!गावठी झटका :

आता सर्वच क्षेत्रात 
भाडोत्री प्रचारक तज्ञ मिळतात 
ते दगडाला देव करतात 
खोटं रेटून खरं आहे चित्र रंगवतात 
लांडगा असला तरी झुल टाकून वाघोबाच 
आहे असं भासवतात "!!

आनंद कोठडीया, जेऊर ८६०५६३८१४९


 
Top