माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मध्यस्थीने मंगळवेढा तालुक्यातील मूढवी येथील आमदार भारत भालकेंचे निकटवर्तीय तानाजी खरात यांनी आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला असून परिचारक गटाला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली असून पूर्व भागात भालकेंना मोठा धक्का बसला आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांनी मंगळवेढा तालुक्याच्या पूर्व भागाला सुरुंग लावला आहे.

धनगर समाजाचे नेते तानाजी खरात यांनी दयावान ग्रुपच्या माध्यमातून अनेक तरुणांना एकत्रित करून मोठी राजकीय ताकत उभी केली आहे.पूर्व भागातील बठाण,उचेठाण,मुढवी,धर्मगाव तसेच दक्षिण भागातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना या भागातून अधिक मताधिक्य त्यांनी मिळवून दिले होते. त्यामुळे यांचा फटका भालकेंना बसणार असल्याचे दिसतव आहे.

याप्रसंगी मंगळवेढा नगरपालिकेचे माजी गटनेते अजित जगताप,भारत पाटील,सरपंच रामेश्वर मासाळ,युटोपियन शुगरचे चेअरमन  उमेश परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 
तानाजी खरात यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना व महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
 
Top