पंढरपूर - सत्ताधारी पक्षासाठी प्रतिष्ठेची आणि विरोधकांसाठी अस्तित्वाची असलेली ही विधानसभेची निवडणूक अत्यंत स्फोटक परिस्थिती पार पडली. यावेळी सर्व पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, उमेदवार यांच्यावर एक प्रकारचा मानसिक दबाव होता . ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची त्यासाठी साम दाम भेद करून जागा आपल्याकडे खेचून आणायची एवढेच फक्त लक्ष होते .अशावेळी सरकारी खात्यातील महसूल विभाग ,पोलीस प्रशासन यांची परीक्षा होती .पंढरपुरातही युती आणि आघाडी यांचे कार्यकर्ते पदाधिकारी जोषात होते. आपलाच उमेदवार नक्की निवडून येणार याची खात्री होती. प्रसिद्धी माध्यम, समाज माध्यमांच्या मार्गाने जेवढा प्रचार करता येईल तेवढे करत होते. अनेक वेळा खालच्या पातळीवर येऊनही प्रचार चालू होता. आम्ही काय करणार यापेक्षा समोरच्याने कसे वाटोळे केले हे दाखवले जात होते . अशावेळी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन, पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांनी संयमाने ही स्थिती संभाळून कोणताही अनुचित प्रकार होऊ दिला नाही. त्यांनी निवडणूकी दरम्यान समाजविघातक गोष्टी करणारांवर कडक कारवाई करण्याचा प्रसिद्धी माध्यमांच्या सहकार्याने इशारा दिला होता.त्याचा चांगलाच परिणाम दिसून आला यासाठी पंढरपूर शहर पोलीस ठाणे, त्यांचे अधिकारी, सर्व कर्मचारी तसेच तालुका पोलीस ठाणे त्यांचे सर्व कर्मचारी आणि महसूल विभागाचे, पंचायत समितीचे सर्व कर्मचारी ज्यांनी रात्रंदिवस राबून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावे यासाठी प्रयत्न करत होते त्यांचे पंढरपूर शहर व तालुका नागरिकांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
  यापुढेही नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता शांततेत जीवन जगावे यासाठी पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, तालुका पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे ,तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी आवाहन केले आहे.   
      पंचायत समिती बीडिओ रविकिरण घोडके , तहसीलदार श्रीमती वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे आणि उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी शांततेत प्रक्रिया पार पाडण्यास मदत केले यासाठी आभार मानले आहेत.
 
Top