पंढरपूरच्या जनतेने मला पंचवीस वर्षे आमदार म्हणून सांभाळले. यामध्ये गेली दहा वर्षाचा खंड होता. मात्र आता २१ ऑक्टोंबरला मतदान करून परत मला पुढील पाच वर्षे जनतेने सांभाळावे जेणेकरून आपण जनतेची सेवा करू शकू. जनतेने आपणास सेवेची संधी यापूर्वी दिली होती. आणि आता यानंतरही पुढे पाच वर्षे द्यावी यासाठी आपणास कमळ चिन्हासमोरील बटण दाबून निवडून द्यावे असे भावनिक आवाहन महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांनी केले.


महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारार्थ शहरातून प्रचार पदयात्रा निघाली होती. सदरच्या पदयात्रेचा समारोप शिवाजी चौकातील जाहीर सभेने झाला. या सभेसाठी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, दिपक वाडदेकर, विलास सांळुखे , भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, श्रीकांत बागल,आरपीआचे संतोष पवार, जिंतेंद्र बनसोडे, शिवसेनेचे शहरप्रमुख रवि मुळे, संजय घोडके, शिवाजी हळणवर, नानासाहेब वाघमारे , संतोष नेहतराव ,जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख , नगरसेवक डी राज सर्वगोड आदि याप्रसंगी उपस्थित होते.

  याप्रसंगी बोलताना आमदार प्रशांत परिचारक म्हणाले , गेल दहा वर्षे भालकेंनी अनेक आश्वासने दिली पण यापैकी एकही आश्‍वासन पूर्ण झाले नाही. या दहा वर्षात एक अंगणावाडी ,बालवाडी , कॉलेजसुध्दा परिसरात उभे केले नाही. एकाही व्यक्तीला रोजगार मिळवून दिला नाही. इतकेच काय तर साधी पिठाची गिरणी देखिल उभी केली नाही. आ.भालकेंनी कायमच फसवण्याचे काम केले स्व औंदुबरआणा , विठठल कारखाना , शेतकरी , मंगळवेढ्यातील ३५ गावची जनता यांची तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची देखिल फसवणूक करण्याचे काम आजर्पत त्यांच्याकडून घडले असल्याचा आरोप यावेळी परिचारक यांनी केला .
सध्याचे वारं बदललं आहे. घरची भाकरी खावून कार्यकर्त्यांनी मालकांचा प्रचार केला आहे . त्यामुळे विजय आपला निश्‍चित आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला 

  त्यानंतर संजय घोडके ,जिंतेद्र बनसोडे,माउली हळणवर,संतोष नेहतराव ,संजय वाईकर ,दिपक भोसले ,श्रीकांत बागल ,नागेश भोसले,विलास सांळुखे ,दिपक वाडदेकर आदींनी मनोगत व्यक्त केली. 

 सभेपूर्वी महात्मा फुले यांच्या पुतळास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेची सुरूवात करत आली. यानंतर हि पदयात्रा गौतम वि्द्यालय ,भाई भाई चौक ,सांगोला चौक ,काळा मारूती ,चौफाळा, नाथ चौक ,जुनीपेठ ,अर्बन बॅक,भौसले चौक , महावीर नगर , डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा , स्टेशन रोडवरून छ. शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अभिावादन करून पदयात्रेचा आणि एकंदर प्रचाराचा समारोप जाहीर सभेने करण्यात  आला.या पदयात्रेत सुधाकरपंत परिचारक यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी , उमेश परिचारक , युवानेते प्रणव परिचारक यांनी थेट जनतेला अभिवादन करून भाजपाला निवडून देण्याचे आवाहन केले.


   या प्रचार काळात सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,केंद्रिय मंत्री रामदास आठवले ,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील , माजी खासदार रणजितसिंह मोहीते पाटील , कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत ,  धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर , भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ , आमदार सुजितसिंह ठाकुर , सिनेअभिनेत्री सुरभि हंडे , माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे आदिंनी प्रचारामधे हजेरी लावली. याशिवाय राहुल शहा , नगरसेवक अजित जगताप , पंढरपूरातून संतोष नेहतराव , प्रताप आणि नागेश गंगेकर, प्रदिप तथा भैय्या पवार , तानाजी खरात , मंगळवेढा आणि पंढरपूरातील सर्व मोहीते पाटील समर्थक , नगरसेवक डी राज सर्वगोड, बळीराजा शेतकरी संघटनेचे माउली हळणवर , जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैया देशमुख , गणेश अंकुशराव आदिंनी सुधाकर परिचारक यांना तथा भाजपा महायुतीला पाठिंबा दिला आहे.
 
Top