मंगळवेढा -  २००९ च्या विधानसभा निवडणुकीत बाटलीभर नसल्याआरोप करणार्यांना दहा वर्षात रखडलेल्या कालव्यातून हुलजंतीपर्यंत देखील पाणी नेता आले नसल्याचा आरोप आ.प्रशांत परिचारक यांनी केला.
      भारतीय जनता पार्टी,रिपाई,शिवसेना, महासंग्राम, रयत क्रांती महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मरवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते .यावेळी आ.सुधाकरपंत परिचारक,वामनराव माने,दिनकर मोरे, दाजी भुसनर, दीपक भोसले, शिवानंद पाटील,राजाराम जगताप,श्रीकांत गण पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 
 आ.प्रशांत परिचारक म्हणाले की, २००९ व २०१४ च्या निवडणुकीत  दिलेल्या जाहीरनाम्यात त्यांनी किती वचन पूर्ण केले हे जरा तपासून बघा. निवडणुकीतील जाहीरनाम्यावर न बोलता सरकारवर बोलायचं, मोठ्या मालकांच्या वयाबद्दल बोलायचं,माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांच्या बद्दल एकेरी बोलायचं शिवराळ काम या तालुक्यात सुरू आहे. विठ्ठलच्या उभारणीत औदुंबर आण्णांबरोबर सुधाकरपंत मालकाचे योगदान आहे. पुढे मतभेद झाले आणि ज्या औदुंबरआण्णांच्या पुढाकाराने कोट्यावधी रुपयांच्या ठेवी जिल्हा बॅकेत असलेल्या कारखान्या वर पाचशे कोटी पेक्षा अधिक कर्ज करून ठेवले. पांडुरंग कारखान्याची रिकव्हरी आणि विठ्ठल कारखान्याची रिकव्हरी यात फरक आहे. एकाच जमीनीतील दोन भावाचा दोन कारखाना जाणाऱ्या उसाच्या वजनात फरक आहे यावर याचे उत्तर आ.भालके यांनी द्यावे त्यासाठी दामाजी चौकात यावे असे जाहीर आव्हान आ.परिचारक यांनी दिले.
 
Top