मंगळवेढा - पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघात टोकण निधी मंजूर झाला,तत्वता मंजूरी मिळाली, तालुका दुष्काळी म्हणून जाहीर झाला तरीसुध्दा फटाक्यांची आतषबाजी करणारे लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला लाभले हे आपले दुर्भाग्य आहे. केवळ आश्वासनांचा पाऊस पाडण्याशिवाय या लोकप्रतिनिधींनी काहीच केलेले नाही,त्यामुळे  या मतदारसंघात परिवर्तन कराव लागणार आहे. त्या साठी मतदारसंघाला समाधान आवताडेंशिवाय पर्याय राहिलेला नाही त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठाम उभे रहा.आमदार नसताना समाधान आवताडे यांनी अनेक कामे केलेली आहेत. अनेकांचे संसार उभे करुन त्यांचे अर्थकारण मजबूत केले आहे. मतदारांनी यावेळी समाधान आवताडे यांना संधी दिल्यास या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार आहे , असे आवाहन शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रा.येताळा भगत यांनी अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना केले .युवकांना रोजगाराच्या संधी नाहीत.आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी रोजगार निर्मीतीचे काम केले नाही. समाधान आवताडे यांनी पंढरपूर येथे नोकरी महोत्सव घेवून १८०० तरुणांना नोक-या मिळवून देवून त्यांना आर्थिक स्थैर्य दिले. अपंगांना कृत्रीम हात-पाय देवून त्यांना मदतीचा हात देवून समाजामध्ये ताठ मानेने उभे केले. दामाजी साखर कारखान्याने शेतकर्‍यांचे हित जपण्याचे काम संचालक मंडळ करीत आहे. कारखान्याच्या निवडणुकीत दिलेली आश्वासनपूर्तीव्दारे ते पूर्ण करत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हयात सर्वात जास्त निधी खेचून आणून योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविल्या आहेत. एवढी कामे करुनही कामाचा कधी गाजावाजा केला नाही. मात्र कांही मंडळी न केलेल्या कामांचा गाजावाजा करण्यात पटाईत आहेत. पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावचा मी दौरा केला आहे. लोकांचा समाधान आवताडे यांना उस्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे .लोकप्रतिनिधीबद्दल चिड, राग व्यक्त होत आहे. या मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे नवं मॉडेल आणू पहाणारं नेतृत्व आपल्याला लाभाव यासाठी यावेळी समाधान आवताडे यांना संधी देण्याचे आवाहन प्रा.येताळा भगत यांनी केले.
 
Top