गोफणगुंडा
:

प्रचाराला आता गती आहे पण
नीती नाही सरस्वतीपेक्षा लक्ष्मीचा प्रभाव आहे 
प्रचार सभा म्हणजे असलीपेक्षा
नकली मालाचा बाजार आहे!!


 डावपेच :

प्रचारात हसत खेळत 
आपलं दुकान चालवायचं असतं 
जिंकून येण्यासाठी गाढवाचेसुद्धा 
पाय धरायचे असतं
जिथे धर मिळेल तिथे पसरायच असतं 
कोणासही नाही म्हणायचं नसतं 
लहान अगदी मुंगी होऊन साखर खायचं 
हेच लक्षात ठेवायचं असतं!!

आनंद कोठडीया , जेऊर 
९४०४६९२२०० , ८६०५६३८१४९


 
Top