पंढरपूर, प्रतिनिधी- महाराष्ट्रात काँग्रेस आय मधील इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) कार्यकर्त्यांनां विधानसभा निवडणुकीत जाणूनबूजून डावलण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या राज्यस्तरीय पदाधिकार्यानी आज भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष संजय वाईकर यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. 

   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस(आय) कमेटीच्या ओ.बी. सी.विभागाचे राज्य सचिव प्रा.अशोक डोळ, पंढरपूर शहर सचिव प्रा.मारूती भोसले, सुरेश काटकर, दिनेश धनवडे,अनिल गायकवाड, वाघमारे, मनोज गावटे, शिवराज कामरा या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंढरपूर भाजपाचे अध्यक्ष संजय वाईकर यांच्या हस्ते पक्षाचे चिन्ह असलेले गमजे गळ्यात घालून पक्षात प्रवेश केला. 

        या प्रसंगी बोलताना प्रा.डोळ यांनी काश्मीर च्या ३७० कलम रद्द केल्याच्या निर्णयाचे स्वागत करून काँग्रेसच्या नेत्यांचा निषेध केला. यापुढे आपण आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वा खाली भाजपाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून कार्य करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. 
 
Top