नांदेड - आज पूर्ण देशात काँग्रेसचे अस्तित्व राहिले नाही.आता काँग्रेसमध्ये पुन्हा उभारण्याची ताकत राहिली नाही २०१४,२०१९ मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेही काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे झालेत असा आरोप ओवेसी यांनी नांदेडमध्ये केला.

 माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच राजकारण खोटारडं आहे . हेच खोटारडं राजकारण अशोक चव्हाण यांना संपवेल अशी घणाघाती टीका एम आय एम प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी नांदेड येथे काल रात्री आयोजित सभेत बोलताना केली. मुसलमानांना हिंदुची मतं मिळत नाहीत असं सांगतात आणि आम्हाला उमेदवारी नको असं मुस्लिम ईच्छुक उमेदवारांकडून लिहून घेतल जात,असा आरोपही ओवेसी यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केलाय.यावेळी ते नांदेडमध्ये दक्षिण आणि उत्तर विधान सभेचे उमेदवार साबेर चाऊस, फेरोज लाला यांच्या प्रचार सभेत बोलत होते 
 
Top