पंढरपूर - पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ३१/१०/२०१९  रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्याचे घोषित केले आहे . 


त्यानिमित्त दिनांक ३१ / १०/२०१९ रोजी सकाळी ६:३० वाजता रन फॉर युनिटी कार्यक्रम घेण्यात येणार आहे .त्याचा मार्ग पंढरपूर शहर पोलीस स्टेशन  - इंदिरा गांधी चौक -अर्बन बँक- भादुले चौक - नाथ चौक - चौफळा- शिवाजी चौक - सावरकर चौक - परत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन असा आहे तरी पंढरपूरमधील सर्व नागरिकांनी यांत सहभागी व्हावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे दयानंद गावडे यांनी केले आहे.

 
Top