विधानसभा निवडणूक निकाल
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मत मोजणी निकालाचे अनुषंगाने पंढरपूर शहर आणि तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरीक व तरूण कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात येते की,

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करीता मतदान झालेनंतर आता दिनांक २४/१०/२०१९ रोजी निकाल जाहीर होणार आहे.

 निकालनंतर आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून येणार आहेत. तेव्हा उमेदवार निवडून आले नंतर 
उमेदवार समर्थक कार्यकर्ते यांचेकडून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढू नये. तसेच शक्ती प्रदर्शन करू नये.

 विजयी उमेदवारांचे डिजीटल, पोस्टर्स व बॅनर लावून अगर पराभूत उमेदवार विरूध्द किंवा उद्देशून आक्षेपार्ह लिखाण करून कोणत्याही प्रकारची पोस्ट मेसेज प्रसारित करू नये.

  काही अति उत्साही तरूण कार्यकर्ते मोटार सायकलच्या  पुंगळ्या काढून विरोधकांच्या घरासमोरून फिरवणे. विरोधकांच्या दरवाजा मध्ये फटाके वाजवणे, गुलाल उधळणे असे कृत्य करून आपापसात तेढ वाढवतात.
    त्यामुळे वाद होवून भांडण तक्रारी होतात त्यातून मारामारी सारखे गंभीर गुन्हे घडतात.  त्याचे खूप वाईट परिणाम स्वतःला,  गावातील लोकांना व नातेवाईकांना भोगावे लागतात.
 अशा प्रकारेच्या केसेस किंवा गुन्हे दाखल झाले मुळे ऐन दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये जेल/तुरुंगामध्ये जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
पुंगळ्या काढून मोटार सायकल फिरवणाऱ्याचे मोटरसायकल चालक यांचेवर वरती कठोर कायदेशीर कारवाई करून मोटरसायकल सुद्धा गुन्ह्यात जप्त करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात येतील.

 गुन्हा दाखल झाल्यानंतर खाजगी किंवा सरकारी कसलीही नोकरी मिळणार नाही त्यामुळे तरूण कार्यकर्ता यांचे भविष्यातील करिअर बिघडू शकते. भविष्यकाळातील फायदेही मिळणार नाहीत.
 ज्याच्यावर गुन्हे दाखल होतील त्यांना भविष्यात पासपोर्ट खाजगी नोकरी मध्ये चारित्र्य पडताळणी सरकारी नोकरी मध्ये चारित्र्य पडताळणी तसेच इतर अनेक उद्योगधंदे करिता लागणारे NOC मध्ये सदर गुन्हे समाविष्ट होऊन सर्व ठिकाणी अडचणी येणार आहेत.

 तसेच सदर प्रकार करण्यामुळे विविध प्रकारच्या कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात.

   यापूर्वीच गुन्हे दाखल असणाऱ्या इसमांना आणखी गुन्हे दाखल झाल्यामुळे तडीपार तसेच यासारख्या विविध प्रतिबंधात्मक कारवायांचा भविष्यात सामना करावा लागेल.

   शक्ती प्रदर्शन करून मिरवणूक काढू नये  तसेच डिजीटल, पोस्टर्स व बॅनर लावून अगर पराभूत उमेदवार विरूध्द किंवा उद्देशून आक्षेपार्ह लिखाण करून कोणत्याही प्रकारची पोस्ट मेसेज प्रसारित करू नये.

   वरील प्रकारच्या कृत्या मुळे गावातील अगर संबंधित भागातील सार्वजनिक शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. 

तरी सर्व तरुण मित्रांना व  कार्यकर्ते, नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की,मतदान निकालाचे दिवशी कायदा व सुव्यवस्था कामी शांतता राखावी ही विनंती आहे असे आवाहन 
पोलीस निरीक्षक,पंढरपूर तालुका पोलीस ठाणे,किरण अवचर यांनी केले आहे.
 
Top