म्हसवड दि.११- वयाच्या पंचाहत्तरीत सुद्धा १०सेकंदात ५० मीटर अंतर पार करणारे मुसाभाई मुल्ला यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नुकतीच नोंद झालेबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.
 

मुख्यमंत्र्यांनी मुसाभाईंच्या या वयातही असणाऱ्या धावण्याच्या कामगिरी बद्दल विशेष कौतुक व आनंद व्यक्त केला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही मुसाभाईंच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले.
    यावेळी पत्रकारांशी बोलताना मुसाभाई म्हणाले की,महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून माझ्या कामगिरीची दखल घेतली गेली याचे मला समाधान असून मी कृतज्ञता व्यक्त करतो.
         

 याप्रसंगी खासदार मा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, मा.आमदार जयकुमार गोरे ,माजी नगराध्यक्ष नितिन दोशी, खटाव तालुका भाजपा अध्यक्ष विकल्प शहा,माण तालुका भाजपा अध्यक्ष बाळासाहेब मासाळ, बाळासाहेब खाडे,मार्तंड गुरव,नगरसेवक अकिल काझी,नितिन चिंचकर, किरण कलढोणे हे उपस्थित होते.


फोटो ओळी- मुसा भाई मुल्ला यांचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार जयकुमार गोरे,विकल्प शहा, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष नितिन दोशी आदि
 
Top