पंढरपूर - श्री विठ्ठल मंदिर, पंढरपूर येथे मंदिर सुरक्षा विभाग येथे कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी वामन यलमार यांनी मंदिरात काम करत असताना सीसीटीव्हीच्या आधारे यापूर्वी पर्स मधील रक्कम चोरणारे गुन्हेगार ,दानपेटीतील रक्कम चोरणारे गुन्हेगार, बनावट पासधारक यांचा शोध लावला आहे. तसेच काल रोजी सीसीटीव्हीच्या साह्याने रुपये २०००/- नोट घेणारे पुजारी यांना पकडून देऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या हस्ते पो.ना. गजानन माळी,पोलीस हवालदार शिवाजी पाटील , पोलीस हवालदार बापू सरडे ,पोलीस हवालदार बाबुराव भोसले ,महिला पो कॉ कुट्टटी आदि कर्मचाऱ्यांसह शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
 
Top