पंढरपूर,(प्रतिनिधी) - पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुधीर भोसले यांची फेर निवड करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे  जिल्हा अध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी घोषीत केले.
सुधीर भोसले यांनी आतापर्यंत केलेल्या पक्ष कार्याची दखल घेत त्यांनी पक्ष संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने करून सरकार समोर सर्व सामान्य जनतेच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.
त्यांचे कार्य पाहून भोसले यांना पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून फेर निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष बळीरामकाका साठे यांचे हस्ते जिल्हा कार्याध्यक्ष राजुबापू पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील,ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस लतिफभाई तांबोळी यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी,विजय काळे, संजय पाटील आदी उपस्थित होते.
 
Top