सोलापूर -जिल्ह्यात हात धुवा दिवस अभियानामध्ये २ लाखा पेक्षा अधिक विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. 
सोलापूर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छ विभागाने आज जागतिक हात धुवा दिना निमित्त विविध शाळांमध्ये हात धुवा दिवसाचे आयोजन केला होते. 
जिल्ह्यात ग्रामपंचायत विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजन करणेत आले होते.सोलापूर जिल्हयात शाळा मध्ये वाचन प्रेरणा दिनाला हात धुवा मोहिमेची जोड मिळाली आहे. 


विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभाग- सिईओ वायचळ

सोलापूर जिल्ह्यात सर्व शाळा व अंगणवाड्या मध्ये हात धुवा दिन साजरा करणेत आला. बाल वयात मुलांवर स्वच्छतेचे संस्कार होणेसाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रेरणादायी आहेत. जिल्हयात चांगला प्रतिसाद या उपक्रमास मिळाला. सर्व तालुक्यांतील व्हाँटसप ग्रुपवर याबाबत नियंत्रण करण्यात आले होते. शिक्षक व अंगणवाडी सेविका यांचे यामध्ये योगदान महत्वपुर्ण आहे. 

*जिल्हा परिषद चकाचक*

*सीसीटीव्हीची राहणार नजर*

जागतिक हात धुवा दिनाननिमित्त सिईओ प्रकाश वायचळ यांनी स्वतः जिल्हा परिषदेच्या गेटवर उभे राहून पार्किंगमध्ये साचलेला कचरा महापालिके च्या सहाय्याने उचलावयास भाग पाडले. यापुढे कुठेही कचरा साचला जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या. 
जिल्हा परिषदेमध्ये सार्वजनिक ठिकाणचा कचरा उचलण्यात आला.पार्किंगच्या जागेत होणारा कचरा थांबविण्यासाठी सीसीटीव्हीची नजर रहाणार आहे.आज जिल्हात हात धुवा मोहिम प्रभावीपणे राबविणेसाठी व स्वच्छता मोहिमेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अविनाश गोडसे यांनी सहभाग घेतला. सिईओ वाईचळ यांनी आज सर्व जिल्हा परिषदेचा कोपरा अन् कोपरा पाहून स्वच्छता ठेवणेचे सुचना दिल्या. सार्वजनिक ठिकाणी परसबागा करण्याच्या सुचना दिल्या.
 
Top