लातूर - दिल्लीला संभाजीराव प्रत्येकवेळी विकास कामासाठी यायचे.अनेक काम त्यांनी मार्गी लावली .महाराष्ट्रात शेतकर्याची परस्थिति संकटाची आहे शेतकऱ्यांनी पिक पद्धति बद्दलली पाहिजे . परिस्तिथि गंभीर आहे पण ती बदलता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .उसाच्या रसापसुन इथेनॉल तयार होतय . आठ लाख कोटी रूपयांची पेट्रोल आयात केली जाते ,आता इथेनॉलमूळे फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले . अगरबत्ती ,चमचे , ग्रामीण भागातील उद्योग वाढवली पाहिजेत. टॉयलेटच्या पाण्यापासून १८० कोटी मिळतात.हे आम्ही नागपुरमध्ये केले तुम्ही करा असा सल्लाही त्यांनी दिला.
पाच वर्षात सहा जिल्हे पेट्रोल-डीझेल मुक्त करणार आहे.देशाला नवीन धोरण स्वीकारण्याची गरज आहे .संभाजीरावांच्या मागे उभे रहा या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असही त्यांनी सांगितले .Tvs कंपनिची मी एजन्सी देणार आहे ती घेण्याच आव्हान गडकरी यांनी केले .पाणी देणे आणि रोजगार देणे हाच आमचा ध्यास आहे .गंगा अविरत निर्मल झाल्याचेही गडकरी यांनी सांगितले. सुपर इकॉनॉमी देणे हाच आमचा ध्यास आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक कणखर नेतृत्व द्यायला हवं आणि ते नेतृत्व संभाजी पाटिल निलंगेकर हे आहेत. संभाजीराव पुन्हा मंत्री होतील असे गडकरी यांनी सांगितले .काही झाल तर माझी आठवण करा मी आपल्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त करतानाच ' केवल राज बदलना नही ,समाज बदलना जरूरी है' असे गडकरी म्हणाले .
 
Top