नेवासा, अहमदनगर - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनियरिंग सर्विसेस परीक्षेत नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील काजल दीपक देशमुख हिने मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे काजल हिचे वडील दीपक शिवाजी देशमुख सैन्यदलात आहेत आणि मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिल्याने हे यश मिळाले असल्याचे सांगितले जात आहे.काजल हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व दहावीपर्यंतचे शिक्षण शहरातील सुंदर गांधी कन्या विद्यालय नेवासा येथे झाले आहे. त्यानंतर नगर येथील रेसिडेंशियल स्कूलमध्ये पदवी घेतल्यानंतर पुणे येथे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या शासकीय महाविद्यालयात तिने इंजिनीरिंग पूर्ण केले .त्यानंतर दोन वर्षे आदित्य बिर्ला ग्रुप वाराणसी येथे नोकरी केली. मावळते आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तिच्या घरी जाऊन सन्मान केला. नगरपंचायत येथे झालेल्या सत्कार समारंभात नगराध्यक्षा संगीता बर्डे ,उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सोलापूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, नितीन देशमुख ,नगरसेवक सुनील वाघ, सचिन नागपुरे ,सतीश पिंपळे, फारूक आतार, अंबादास इरले, डॉ. करण घुले, महेश मापारी, राजेंद्र मापारी, विजय गांधी, सुधीर चव्हाण ,मकरंद देशपांडे, यांनी काजलचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या
 
Top