पुणे : 'त्या' प्रश्नावर अजित पवारांचा पारा चढला, चंद्रकात पाटलांना चक्क 'चंपा'च म्हटले चंपा हा शॉर्ट फॉर्म आहे, अप म्हणजे कसं अजित पवार तसं चंपा.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची चांगलीच खिल्ली उडवली. सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधक कार्यकर्त्यांकडून ज्याप्रमाणे खिल्ली उडविण्यात येते त्याचप्रमाणे अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचा नामोल्लेख केला. पवार कुटुंबीयातील तरुण भविष्यात भाजपामध्ये येऊ शकतात, आणि आले तर त्यांचे स्वागत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावरुन अजित पवारांना पत्रकाराने प्रश्न विचारला होता. त्यावेळी, अजित पवारांनी थेट चंपा असाच उल्लेख चंद्रकांत पाटील यांचा केला. 

    चंपा हा शॉर्ट फॉर्म आहे, अप म्हणजे कसं अजित पवार तसं चंपा. ते जे काही म्हणतात त्याला काहीही अर्थ नाही. ते शऱद पवार यांनाही राजकारणातून बाजूला जातील म्हणतात. तुम्हाला तरी पटतं का? असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. पवारसाहेब कधी राजकारणातून बाहेर जातील का, त्यांनी किती चढ-उतार पाहिलेत. ५५ पैकी केवळ ५ आमदार उरल्यानंतरही ते तितक्यात तडफेत बाहेर पडले. आजही, किती आक्रमकपणे ते महाराष्ट्रात आपली भूमिका मांडतायंत. मला हे सरकार बदलायचंय असं सांगत महाराष्ट्रभर फिरतायंत, असे सांगत चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं.
 
Top