राष्ट्रीय एकता दिनी आयोजित दौडला उस्फुर्त प्रतिसाद
                                                                           सोलापूर, दि.३१ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकता दौडला (रन फॉर युनिटी) आज सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरवर्षी सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात येते.  
      जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग,केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांच्या लोकसंपर्क कार्यालयतर्फे या दौडचे आयोजन करण्यात आले होते.
        एकता दौडला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चार पुतळा चौक येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हिरवा ध्वज दाखवून दौडला सुरवात केली. त्याअगोदर त्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी, नागरिक यांना एकतेची शपथ दिली.
       यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, शिक्षण अधिकारी संजय राठोड , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे व्यवस्थापक चंद्रकांत बरडे , उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
        एकतेची शपथ दिल्यानंतर दौड व्हिआयपी रोडमार्गे डफरीन चौक ते एम्प्लॉयमेंट चौक ते सात रस्ता या मार्गे शासकीय विश्रामग्रह येथे आली. तिथेच दौडचा समारोप झाला.
       दौडमध्ये राज्य राखीव बलचे असिस्टंट कमांडट बंडगर, सोलापूर रनर्स असोसिएशनचे डॉ. सत्यजीत वाघचवरे, सोलापूर ॲथलॅटीक्स असोसिएशनचे राजू प्याटी, टेनिस असोसिएशनचे सचिव राजीव देसाई, एनएचआयचे व्यवस्थापक अनिल विपत, क्रीडा कार्यालयाचे नदीम शेख, वन विभागाच्या संध्याराणी बंडगर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सचिव अविनाश गोडसे, महाराष्ट्र बटालियनचे वसंत जाधव, शहाजी पाटील आदीसह लहान मुले ,युवक-युवती, पोलीस अधिकारी-कर्मचारी, महसूल, क्रीडा, महानगर पालिका आदी विभागातील अधिकारी- कर्मचारी  उत्साहाने  सहभागी झाले होते.
 
Top