देशभरात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी एनआयआयएफ आणि ईईएसएल एकत्र

मुंबई - वीज वितरण कंपन्यांच्या देशभरात स्मार्ट मीटर बसवण्याच्या योजनेची अमंलबजावणी, वित्त पुरवठा आणि परिचालनासाठी नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्रर फंड (एनआयआयएफ) आणि एनर्जी एफिशिअन्सी सव्‍‌र्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) यांनी इंटेलिस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (इंटेलिस्मार्ट) या संयुक्त उपक्रमाची घोषणा केली आहे.

ऊर्जेच्या विविध पर्यायांच्या मिश्रणातून उभी राहणारी आव्हाने आणि प्रत्येक भारतीयाला  २४ तास अव्याहत वीज पुरवठा करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट यांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या स्मार्ट ग्रिडचा पाया स्मार्ट मीटर्सच्या माध्यमातून रचला जाणार असल्याची माहिती कंपन्यांमार्फत देण्यात आली.

       येत्या काही वर्षांत २५ कोटी स्मार्ट मीटर बसवण्याची भारत सरकारची योजना असून जुन्या पारंपरिक मीटरची जागा स्मार्ट मीटरने घेतल्यावर विजेच्या प्रत्यक्ष वापरानुसार देयक बनवण्याच्या क्षमतेत ८० ते १०० टक्कय़ांनी सुधारणा होणार आहे; शिवाय वीज वितरण कंपन्यांच्या उत्पन्नात १ लाख १० हजार ४०० कोटी रुपयांची वाढ करण्याची यात क्षमता असून देशात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेचे नेतृत्व ईईएसएल करत आहे.आजवर ६ लाख २५ हजारहून अधिक स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत .
 
Top