मंगळवेढा
-पंढरपूर या मतदारसंघातील महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून महिलांच्या आर्थिक विकासासाठी सुधाकरपंत परिचारक यांना साथ देऊन आपण विजय करूयात .भाजप पक्षाचे कार्य व त्यांच्या कामाची पद्दत विकासाच्या दृष्टीने चालत आहे.गरिबांना व महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या योजना चालू करून त्याचा लाभ त्यांना मिळवून दिला आहे.महिला बचत गटाच्या माध्यमातून आमच्या सरकारने बिनव्याजी कर्ज वाटप करून महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम केले आहे.महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन केंद्र शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेली उज्वला गॅस योजना महिलां साठी वरदान ठरली आहे. या योजनेच्या माध्यमा तून तासनतास चुलीपुढे बसून स्वयंपाक करण्याचा महिलांचा त्रास कमी झाला आहे. यातून महिलांचे आरोग्या बरोबरच स्वयंपाकाला जाणारा वेळ वाचल्याने महिलावर्ग उर्वरित वेळामध्ये लहान-मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे, असे प्रतिपादन मराठी सिने अभिनेत्री सुरभी हांडे यांनी केले आहे.त्या मंगळवेढा येथील मुरलीधर चौकात भाजप उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांनी आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात बोलत होत्या.


व्यासपीठावर सीमाताई परिचारक,महिला बालकल्याण सभापती रजनी देशमुख,शीतल बुरकुल,ज्योती चव्हाण,अंजली मोरे,अश्विनी शहा,नगरसेविका निर्मला माने,पंचायत समिती सदस्य राजश्री नागणे,रेणुका साळुंखे,शुभांगी सूर्यवंशी,सविता स्वामी आदी उपस्थित होते.

यावेळी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन चरणूकाका पाटील,बळीराजा बँकेचे चेअरमन दामोदर देशमुख,नगरसेवक अजित जगताप,शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,शिवानंद पाटील,माजी नगरसेवक महादेव जिरगे,चंद्रशेखर कोंडुभैरी, मुजफ्फर काजी,सरपंच रामेश्वर मासाळ,खन्ना माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top