मंगळवेढा - पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनता समस्यांच्या विळख्यात भरडली जाऊन आश्वासनाच्या खोल गर्तेत बुडालेली आहे, या परिस्थिला केवळ लोकप्रतिनिधी जबाबदार असून ही परिस्थिती बदलायची असेल तर लोकप्रतिनिधी बदला सर्व समस्यातून मुक्त करेन असे आवाहन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी केले. ते डोंगरगांव, हाजापूर, जालीहाळ, सिध्दनकेरी, रड्डे, शिरनांदगी, चिक्कलगी, मारोळी, जंगलगी, लवंगी, सलगर बु. या गावांमध्ये आयोजीत केलेल्या प्रचार सभांमध्ये ते बोलत होते.

पुढे बोलताना समाधान आवताडे म्हणाले, काळ कुणासाठी थांबत नसतो. युवकांमध्ये बुध्दीमत्ता आहे पण ती वापरण्याची संधी युवकांना मिळत नाही. या  मतदारसंघाचे तारुण्य वाया गेलं तर पुढची पिढीही अडचणी येणार आहे. गेलेला काळ आपण आणू शकत नाही पण भविष्य चांगलं घडविणे हे तर आपल्या हातात आहे.यासाठीच पुढील काळात या मतदारसंघामध्ये मला औद्योगीक क्रांती करायची आहे.यासाठीच राजकारणाची मशागत करण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्यांच्या घरची आर्थिक स्थिती सक्षम होणे गरजेचे आहे. सभासदांनी मोठ्या विश्वासाने त्या विश्वासास पात्र राहूनच कारखान्याचा कारभार करीत आलो आहे. रस्त्याची आश्वासने, पाण्याची आश्वासने, विजेबाबत आश्वासने … किती दिवस आश्वासनावरच जगणार आहोत आपण. पाणी वाटप समितीचे सदस्य असूनही लोकप्रतिनिधीं कडून पाणी वाटपाचे नियोजन झालेले नाही. मतदारसंघाच्या समस्या विधानसभेमध्ये व्यवस्थती मांडल्या गेल्या नाहीत. सत्ता विरोधात आहे अशी तकलादू कारणे सांगून आजपर्यंत वेळ मारुन नेण्याचेच काम झालेले आहे. दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात आता मरणार नाही. हे चित्र बदलण्यासाठी मला विकासाची नांदी आणायची आहे. या मतदारसंघाला न्याय देण्याचे काम मला करायचे आहे  यासाठी येत्या २१ तारखेला माझे चिन्ह ट्रॅक्टर असणा-या चिन्हाच्या पुढे बटण दाबून परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शेवटी समाधान आवताडे यांनी केले.

याप्रसंगी सभापती प्रदिप खांडेकर,प्रा.येताळा भगत सर, दत्तात्रय जमदाडे सर, पंचायत समिती सदस्या उज्वला मस्के, प्रा.समाधान क्षिरसागर, डॉ.लक्ष्मण हेंबाडे कृष्णदेव नागणे, द-याप्पा कांबळे,बसवंत पाटील, रामचंद्र कोरे, हणमंत कोरे सर, शिवाजी खडतरे, युवराज कांबळे सर, राजकुमार स्वामी, हणमंत तेलगांव आदिनीही मनोगत व्यक्त केले.
या प्रचार दौ-यांमध्ये समाधान आवताडे यांना पाठिंबा देण्याचा धडाका वाढतच असल्याचे दिसून आले. यामध्ये वडार समाज संघटणा,मंगळवेढा चे युवक दत्ता देवकर,संतोष जाधव,रवी मुदगूल, विशाल धोत्रे अक्षय जाधव,उमेश जाधव, आण्णा जाधव, सुरेश जाधव, सागर मुदगूल यांचा समावेश होता.
तसेच प्रहार शेतकरी संघटणेनेही समाधान आवताडे यांना पाठींबा जाहीर करुन प्रवेश केला. यामध्ये प्रहार संघटणेचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी तसेच अमोगसिध्द काकणकी,महेश तळळे, आप्पाराया काकणकी,रामगोंडा व्हनुटगी, सिध्दाराम कोळी, अरिफ शेख,अल्लाऊददीन शेख,मुन्ना पटेल,रमजान पटेल तसेच डोणज, कागष्ट,अरळी येथील प्रहार संघटनेच्या असंख्य कार्यकत्यांनी समाधान आवताडे यांना पाठिंबा जाहीर केला. हाजापूर येथे द-याप्पा कांबळे, जंगलगी येथे चौगुले गट, भागाप्पा चोपडे,सलगर येथे बसवराज पाटील,मल्लीकार्जून पाटील, रविराज पाटील,निलकंठ साखरे, पंडीत मोहिते, अल्लाप्पा सर्जे,लवंगी येथे मा.सरपंच गंगुबाई खांडेकर, रहिन शेख मित्रमंडळ, एस.एस. ग्रुप लवंगी आदीनी उमेदवार समाधान आवताडे यांना पाठींबा दिला आहे. जाहीर पाठींब्याचा हा ओघ जोमाने सुरु आहे.
  या दौ-याचे वेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप चव्हाण, मार्केट कमेटी सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी कारखान्याचे संचालक मारुती थोरबोले, लक्ष्मण नरुटे, रामकृष्ण चव्हाण,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे,लक्ष्मण मस्के, सत्यजीत सुरवसे,पिनू आवताडे,सुनिल लोखंडे, बाळासो कवाळे, शंकर मेटकरी, शिवाजी जाधव, गनीम पठाण, बाबा सय्यद, अशोक जाधव, मधुकर मोरे,भारत पाटील, शंकर कोकरे, सुरेश कांबळे, विठठल कोरे,सकलेश कोरे, शिवाजी कोरे,ईश्वराप्पा बिराजदार, अमृत उमराणी, गुरुसिध्दाप्पा हत्ताळी, संगाप्पा हत्ताळी, जनार्धन थोरबोले, विनोद सुतार, डॉ.भिमराव जावीर,उत्तम थोरबोले, सोमनिंग हत्ताळी, भागाप्पा पडवळे, गोपाळ ठोंबरे, निंगोंडा पाटील, रामचंद्र शेंबडे, रामचंद्र पाटील सर,मायाप्पा गावडे, अमृत पाटील, शिवाजी फटे, नामदेव करांडे,किसन हजारे,बापू शिंदे,आप्पासाहेब माने,राम निकम,गफूर पाटील,याकूब पाटील, रईस शेख,मायाप्पा पांढरे,सदाशिव लेंगरे, यांचेसह संबंधीत गावातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी चेअरमन, सदस्य, पदाधिकारी, समर्थक, ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन अशोक उन्हाळे, सचिन माळगे यांनी केले.
 
Top