पंढरपूर - पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ शिवसेना-भाजप-रयत क्रांती रिपाई महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना ,गेल्या पाच वर्षातील कारभार जनतेने पहिला आहे.त्यामुळे संपूर्ण जनता आमच्या सोबत आहे.दिशाभूल करणे खोटी आश्वासन देने या पलीकडे गेली १५ वर्ष विरोधकांनी काहीच केलं नाही.गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो.


शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली,वेगवेगळी मदत मिळवुन दिली. शिवसेना-भाजपा युतीने केलेल्या विकासकामांमुळे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षच शिल्लक राहिला नाही.माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आता आम्ही थकलो असून दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याचा दिलेला सल्ला योग्य असल्याचे, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. प्रशांत परिचारक, उमेदवार सुधाकरपंत परिचारक, शहाजीबापू पाटील ,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक,भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,कल्याणराव काळे, शिवाजी सावंत, अजित जगताप, शशिकांत चव्हाण,मंगळवेढा रतनचंद शहा बँकेचे चेअरमन  राहुल शहा,पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले,औदुंबर वाडदेकर, चंद्रशेखर कौडुभैरी, चरणुकाका पाटील,गौरीशंकर बुरकुल संतोष मोगले,मधुकर चव्हाण,बिरूदेव घोगरे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
   बोलताना,मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्ष असलेल्या आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला करत ते सरकार पुन्हा निवडून येणार नसल्यामुळे सध्याच्या निवडणुकीत जे आश्वासन पूर्ण करता येत नाही, असे आश्वासन देऊन मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांच्या आश्वासनाला महाराष्ट्रा तील जनता बळी पडणार नाही.शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने पाच वर्षात केलेल्या विकास कामांमुळे मतदार पुन्हा आमच्या पाठीशी उभा राहणार आहे.


५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, दुष्काळ निधी, अतिवृष्टी मदत, ट्रॅक्टरसाठी अनुदसाठी अनुदान, जनावरांसाठी छावण्या, उपचारासाठी तसेच अन्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत केली आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम देखील चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यात झाले आहे.सांगली,सातारा , कोल्हापूर या भागातील पूर परिस्थिती आणि समुद्राला जाणारे पाणी वळवून सोलापूर जिल्ह्या तील दुष्काळी परिस्थितीचा विचार करता कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाला देण्याच्या दृष्टीने आमचे सरकार गंभीर असून या पुढील काळात दुष्काळ मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राबवताना या सरकारमध्ये सरकारचे प्रतिनिधी करणारा प्रतिनिधी म्हणून संतनगरीतून संत असलेल्या सुधाकरपंत परिचारक यांना संधी दिली आहे. म्हणून आपण त्यांना विजय करून विधानसभेत पाठवावे या भागातील प्रश्नासाठी शिवसेना-भाजप युती सरकारच्या माध्यमातून केलेल्या प्रश्नाला न्याय दिला जाईल.

या सभेसाठी प्रास्ताविक आ.प्रशांत परिचारक यांनी करताना पाणीप्रश्‍नाचे गांभीर्य अधोरेखित  केले.सुत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.आभार प्रदर्शन जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर यांनी केले . 
मुख्यमंत्री म्हणाले, ३० हजार किलोमीटरचे रस्ते आम्ही पूर्ण केले आहेत तसेच अनेक ठिकाणी राष्ट्रीय महा मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. राज्यातील शेतकर्‍यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे . येत्या २०२२ पर्यंत राज्यात ज्याला घर नाही त्याला ते देण्यात येईल.यावेळी त्यांनी मंगळवेढा नगरीत महात्मा बसवेश्‍वर व संत चोखामेळा यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल असे सांगत विधानसभा निवडणूक संपल्यानंतर हे काम हाती घेतले जाईल असे स्पष्ट केले. राजकारणातील संत असणार्‍या सुधाकरपंत परिचारक यांना या मतदारसंघातील मतदारांनी विधानसभेत पाठवावे असे आवाहन केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्ष असलेल्या आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला करत ते सरकार पुन्हा निवडून येणार नसल्यामुळे सध्याच्या निवडणुकीत जे आश्वासन पूर्ण करता येत नाही, असे आश्वासन देऊन मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांच्या आश्वासनाला महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही.शिवसेना -भाजप युतीच्या सरकारने पाच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे मतदार पुन्हा आमच्या पाठीशी उभा राहणार आहे.
 
Top