मुंबई, - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अभिनयासाठी जितका ओळखला जातो त्यापेक्षा जास्त त्याच्या चित्रविचित्र अवतारातील कपड्यां मुळे चर्चेत असतो. कोणत्याही कार्यक्रमाला तो नेहमीच आगळ्या वेगळ्या ढंगात हजर असतो.     
    सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये रणवीरसिंग एका रेकॉर्डिंग स्टुडिओतून बाहेर पडताना चाहत्यांनी त्याला गराडा घातला. त्यावेळी सेल्फीसाठी एक चाहता त्याच्या लहान मुलीला घेऊन उभा होता. रणवीर जवळ येताच चाहत्याने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण रणवीरचा अवतार पाहून घाबरलेली चिमुकली वडिलांना बिलगून रडू लागली.
 
Top