मंगळवेढा
-पंढरपूर या मतदारसंघातील महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत याची सोडवणूक करण्यासाठी सुधाकरपंत परिचारक यांना साथ देऊन आपण विजय करूयात.भाजप पक्षाचे कार्य व त्यांच्या कामाची पद्दत विकासाच्या दृष्टीने चालत आहे.गरिब व महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या योजना चालू करून त्याचा लाभ त्यांना मिळवून दिला आहे.महिला बचत गटाच्या माध्यमातून आमच्या सरकारने बिनव्याजी कर्ज वाटप करून महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम केले आहे.महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले उज्वला गॅस योजना महिलांसाठी वरदान ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून तासनतास चुलीपुढे बसून स्वयंपाक करण्याचा महिलांचा त्रास कमी झाला आहे.महिलांचे आरोग्याबरोबरच स्वयंपाकाला जाणारा वेळ वाचल्याने महिलावर्ग उर्वरित वेळा मध्ये लहान-मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक पाठबळ उपलब्ध होत आहे असे प्रतिपादन भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे.त्या मंगळवेढा येथील श्रीराम मंगल कार्यालयात सुधाकरपंत परिचारक यांनी आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अश्विनी शहा होत्या.
 पुढे बोलताना महिला आर्थिक विकास महा मंडळाच्या उपाध्यक्षा तथा भाजपाच्या राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाले की ,ज्या व्यक्तिमत्वाने आयुष्यभर मतदार संघाच्या विकासाची कास धरून आपली वाटचाल केली त्या सुधाकरपंत परिचारकांच्या पन्नास वर्षाच्या विकासाच्या राजकीय डोंगरापुढे पाच-दहा वर्षाचे वारुळं काय करू शकणार आहे .
 यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ.जयसिध्देश्वर महाराज, माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे,शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, सीमाताई परिचारक,कोमल साळुंखे-ढोबळे,माजी जि.प उपाध्यक्ष वैशाली सातपुते, महिला बाल कल्याण सभापती रजनी देशमुख, शीतल बुरकुल,ज्योती चव्हाण, अंजली मोरे, अश्विनी शहा,नगरसेविका निर्मला माने, पंचायत समिती सदस्य राजश्री नागणे, रेणुका साळुंखे, शुभांगी सूर्यवंशी, सविता स्वामी,खन्ना माळी,रतनचंद शहा बॅकेचे चेअरमन राहूल शहा,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप,अविनाश कोळी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी मंगळवेढा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षा अंजलीताई  भिमराव मोरे यांनी चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला.
   याप्रसंगी खासदार डॉ.जयसिध्देश्वर महाराज, माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे,सीमा परिचारक, अंजली मोरे,वैशाली सातपुते आदींनी मनोगत व्यक्त करून सुधाकरपंत परिचारक यांना विजय करण्याचे आव्हान केले.
कार्यक्रमाचे प्रस्तावित अजित जगताप यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती कोंडुभैरी-दिवसे यांनी केले. आभार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी मानले.
 
Top