अलिबाग - आपण सारेजण पुढील जीवनात वकील म्हणून समाजात सेवा करणार आहात. तेव्हा चेहऱ्यावर कायमचे हास्य आणि जीभेवर गोड खडीसाखरेचा खडा ठेवा. ज्यामुळे तुमच्या व्यवसायावर कधीही केव्हाही आपत्ती येणार नाही, असे मार्गदर्शन रायगड भूषण व आपत्ती सुरक्षा तज्ञ, राष्ट्रीय सचिव भारतीय पत्रकार संघाचे जयपाल पाटील यांनी भागीरथी चांगू ठाकूर विधी महाविद्यालय नवीन पनवेल यांनी आयोजित केलेल्या आपत्ती व सुरक्षा कार्यशाळेत सांगितले. 

यावेळी अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड या उपस्थित होत्या. 

प्रारंभी सूत्रसंचलन करणारी सुजाता चिमणे हिने जयपाल पाटील यांनी आत्तापर्यंत राजस्थान, आसाम, झारखंड, कर्नाटक आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपत्ती प्रशिक्षण दिल्याने रायगड जिल्हा परिषदेने मागील वर्षी या विषयाबाबत रायगड भूषण पुरास्काराने सन्मानित केले. तर अखिल भारतीय आगरी समाज संस्थेने राष्ट्रीय पुरस्कार देवून गौरविले असून ते महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी प्रकल्प विभागाच्या रायगड व रत्नागिरी आश्रम शाळांमध्ये आपत्तीचे प्रशिक्षण देत आहेत. देशभरात ३४ नागरीकांना आपत्तीचे प्रशिक्षण दिल्याबद्दल प्राचार्या डॉ. शितल गावंड यांच्या हस्ते जयपाल पाटील यांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी रायगडचा युवक फाउंडेशनचे सदस्य भाषा तज्ञ सुनिल प्रधान यांनी स्वच्छतेवर मार्गदर्शन केले. त्यानंतर जयपाल पाटील यांनी साप, विंचू दंश व पाण्यात बुडणे यावेळचे प्रथमोपचार प्रात्यक्षिक, घरातील गॅस, विजेची उपकरणे, मोबाईल यांच्यामुळे होणारे अपघात व उपाय, महाराष्ट्र शासनाचा आपत्ती २०१५ च्या कायद्याची माहिती, विना वाहन परवान्याने होणाऱ्या नुकसानीची माहिती देताना २ महिला वकील यांच्याकडे वाहन परवाना नाही तरी त्या वाहने चालवितात, अपघात झाला तर काय होईल याची त्यांना माहिती दिली. 

अपघात वेळी १०८ रुग्णवाहिकेचा वापर कसा करावयाचा याचे प्रात्यक्षिक दाखविले असता, १०८ रुग्णवाहिका तेथे येवून डॉ. रचना खोत यांनी माहिती दिली. या कार्यशाळेत कॉलेजचे ८० विद्यार्थी व १५ कर्मचारी व प्राचार्य मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आपल्या ओघवत्या वाणीने सूत्रसंचलन सुजाता चिमणे हिने केले. 
 
Top