पंढरपूर, - पंढरपूरमध्ये अंध अपंगांना व कुष्ठरोगी यांना मायेची ऊब देण्याचे काम संत तनपुरे महाराज चारोधाम ट्र्स्ट अनेक वर्षा पासून करीत आहेत. ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे हे अखंडपणे सुरू असलेली सेवा अव्याहत पणे पुढे सुरू ठेवली आहे. बाबांचे हे कार्य दुसरी पिढी देखील तितक्याच सक्षम पणे पुढे नात आहे. ऐन दिपावली सणाच्या धामधूमीत  आपण कुटूंबा बरोबर दिपावली साजरी करतो पण अंध अपंग यांची दिवाळी कोण करणार? 
यांचे उत्तर संत तनपुरे चारोधाम येथे दिपावली पाडव्याच्या दिवशी बाबा अंध अपंग यांना मायेने तेल लावून गरम पाण्याने अभ्यंग स्नान घालतात. 
ज्या चारोधाम ट्रस्ट मध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी, थोर समाजसेवक विनोबा भावोत्कट यांनी भेट दिली. त्यांच चारोधाम ट्रस्ट मध्ये अंध अपंगांची दिपावली मोठ्या उत्साहात साजरी होते. उटणे लावून अभ्यंग स्नाना बरोबरच त्यांना दिपावलीचा पोटभर गोड फराळ , भोजनाची देखील सोय करतात. महिला साडी चोळी व पुरुषांना त्याच्या आवडीनुसार पोशाख दिला जातो. 


या वर्षी या सोहळ्यात सहभागी होणेची संधी मिळाली. माझ्या दोन मुलांना आदित्य व सात्विक  यांना घेऊन मी चारधाममध्ये दिपावली पाडव्याच्या दिवशी सकाळी गेलो होतो. आदित्य व सात्विक मला या कार्यक्रमाचे महत्त्व आवर्जून विचारत होते. 
दिव्यागांना आधार देण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे. पंढरपूर हे तिर्थ क्षेत्र असल्यामुळे अनेक जण या ठिकाणी आश्रयाला येतात. वारी संपल्यानंतर दिव्यांग बेदखल होतात.  यांचा आश्रयदाता होण्याचे परमभाग्य बाबांनी उठवलेले आहे. दीपावलीच्या सणाच्या दिवशी दिव्यांगाना मायेनं वाढलेले फराळ खाताना त्याच्या चेहर्यावर आनंद दिसून येत होता. वर्षभर अंगाला पुरेल एवढे कपडे दिलेले आणि प्रेमाचे अंभ्यगस्नान दिव्यांग मंडळी विसरू शकत नाहीत. 
पुणे येथील संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पोथी मंडळींकडून देखील या सेवेत गेल्या ६० वर्षापासून सहभागी होत आहेत.सर्व दिव्याग बांधवांनी फराळ करून प्रेमाची ढेकर दिल्यानंतर ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे बाबांनी भोजन केले. 
आज समाजसेवेचे व्रत हाती घेऊन ते अव्याहत पणे पुढे नेत असताना ह.भ.प. अनंत महाराज तनपुरे व त्याच्या सुविद्य पत्नी डाॅ. शुभांगी तनपुरे या देखील तितक्याच जोमाने पुढे नेत आहेत. दिव्यांगाची सुश्रूषा करण्यापासून त्यांना  आपुलकीने भोजन व कपडे देण्यापर्यंत त्या लक्ष ठेवत पतीसह सेवेत सहभागी झाल्याचे दिसून आले. 
जवळपास १०० पेक्षा अधिक दिव्यांग बांधव या दिपावली उपक्रमांत सहभागी झाले होते. मला पण सेवा करण्याचा योग या निमित्ताने आला. पत्रकारितेत असताना मी चारोधामला पाडव्याच्या दिवशी भेट द्यायचो. गेली पाच वर्षे खंड पडला होता. परवा योगायोग आला. अन् सहभागी झालो. 

- *सचिन जाधव*,सोलापूर 
 
Top