बोहाळी ता. पंढरपूर येथील आप्पासाहेब जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज सुधाकरपंत परिचारक यांच्या उपस्थितीत परिचारक गटात प्रवेश केला त्यांच्यासमवेत त्यांचे सहकारीही यावेळी उपस्थित होते.


सुधाकरपंत परिचारक यांना पूर्वीपासूनच बोहाळी गावची साथ लाभली होती परंतु मध्यंतरीच्या काळात काही राजकीय घडामोडी झाल्या त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांनी परिचारक गटापासून फारकत घेतली होती त्यामध्ये आप्पासाहेब जाधव हेही होते . आप्पासाहेब जाधव मागील दहा वर्षापासून भारत भालके यांच्या गटाचे काम करत होते .आज परत अप्पासाहेब जाधव यांनी पुन्हा सुधाकरपंत परिचारक यांचे नेतृत्व मान्य केले.
परिचारक गटांनी बोहाळीचे जाधव यांना श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक व व्हाईस चेअरमनपद बहाल केले होते . परंतु मध्यंतरीच्या काळात दुरावा निर्माण झाला होता .
आज बोहाळी येथे पार पडलेल्या सुधाकरपंत परिचारक यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या सभेत आप्पासाहेब जाधव उपस्थित होते.त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये आपण परिचारक गटात प्रवेश करीत असून त्यांना बोहाळी गावातून मताधिक्‍य देणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.  तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्याचे व पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून उभा राहिलेले  सुधाकरपंत परिचारक यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
 
Top