पंढरपूरच्या जुना सोलापूर नाका परिसरातील महिलांचा पाण्यासाठी मुख्याधिकार्‍यांसमोर आक्रोश... 

पंढरपूर (प्रतिनिधी):- चंद्रभागा नदी दुथडी भरुन वाहत असतानाही चंद्रभागेच्या नदीकाठावर असलेल्या जुना सोलापूर नाका परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नामुळे त्रस्त असलेल्या या भागातील महिलांनी नुकताच पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्यासमोर पाण्यासाठी आक्रोश केला. हा पाणीप्रश्‍न ठेकेदाराच्या चुकीमुळे झाला असून संबंधीत ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी व पाणीप्रश्‍न सोडवावा अशी मागणी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केली आहे.
   ड्रेनेजचे काम चालु असताना ठेकेदाराच्या चुकी मुळे पिण्याच्या पाण्याच्या पाईप फुटल्याने हा पाणीप्रश्‍न निर्माण झाला आहे.लवकरात लवकर या पाईप लाईनची दुरुस्ती होऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नगरपरिषद प्रशासन प्रयत्न करील असा आशावाद नगरसेवक विक्रम शिरसट यांनी व्यक्त केला.
  नुकतीच हा प्रश्‍न घेवुन नगरसेवक विक्रम शिरसट व परिसरातील महिलांनी मुख्याधिकारी यांची भेट घेतली. पाण्याच्या प्रश्‍नाची दाहकता त्यांना दर्शवुन दिली व लवकरात लवकर हा प्रश्‍न सोडवावा अशी मागणी केली.
 
Top