पंढरपूर ,(प्रतिनिधी) - येथील नेहतराव कुटुंबियांनी भाजपामध्ये प्रवेश करून २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील भाजप शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना पाठिंबा जाहीर करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.संतोष नेहतराव हे एकेकाळी परिचारक गटाचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून परिचित होते परिचारक गटानेही त्यांच्या मातोश्री सौ सुमनताई नेहतराव यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले होते.श्री.परिचारक यांनी सुरेश नेहतराव, बाळासाहेब नेहतराव यांनाही पंढरपूर नगरपरिषदेमध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली होती. आता ते परिचारक यांच्या विजयासाठी सरसावले असून कोणत्याही परिस्थितीमध्ये परिचारक यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.काल पंढरपूर येथे नेहतराव कुटुंबीयांचे कुटुंबप्रमुख वसंतराव नेहतराव, बाळासाहेब नेहतराव ,सुरेश नेहतराव,व संतोष नेहतराव या सर्वांनी परिचारक यांना पाठिंबा देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने पंढरपूर मध्ये परिचारक गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
 
Top