आटवून रक्त, शेतकरी पिकवतो हिरवा मळा
श्रम मातीमोल हाती कुसळ  सोसतो अवकळा !!


नाही धोरण , सोसतो मरण,
शेती कर्जाचे कुरण झालं आहे 
श्रमाचा पंचनामा नरड्याचा फास  पक्का आहे !!

शेतीत ज्ञान नाही , ज्ञानात शेती नाही 
शेतीतले बोलत नाहीत,
बोलातात ते शेतीत नाहीत !!

व्याजावर व्याज कर्ज फिटत नाही  
आत्महत्या टळता टळत नाही !!

कर्जमुक्ती कर्जमाफी स्पष्ट आदेश निघत नाही 
केवळ घोषणेनें सातबारा कोरा होत नाही !!

शेतीला विम्याचे प्रबळ कवच  उपलब्ध  नाही 
शेतकऱ्यांना आर्थिक शाश्वती  मिळत नाही !!

योजानावर योजना सादर करत आहेत  
अनुदान लाटण्यापर्यंतच सारेच मर्यादित आहेत !!

शेतकरी धोरण तज्ञांचे अहवाल ढीग लागले आहेत 
गोदामात त्यावर उंदीर बिनधास्त खेळत आहेत !!

शेती सक्षम करणे दुर्लक्षित ठेवले जात  आहे 
जाईल तिथे अपेक्षाभंगच पदरी पडत आहे !!

आनंद कोठडीया,९४०४६९२२००


 
Top